धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बापूजी साळुंखे लॉ कॉलेज, धाराशिव येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य श्री. अभयकुमार साळुंखे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार 17 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. हा दिवस संस्थेच्या वतीने “ ज्ञान शिदोरी दिवस“ म्हणून साजरा केला जातो.

महाविद्यालयाचे प्राचार्य कायला कृष्ण मुर्ती, सह्याद्री ब्लड बँकेचे नानासाहेब करंजकर, यांनी स्वामी विवेकानंद व डॉ बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. कायला कृष्ण मुर्ती यांनी, “श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची कार्यप्रणाली, डॉ बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य व कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणाऱ्या ज्ञान शिदोरी दिनाचे महत्त्व या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अजित शिंदे यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. व्हि.जी. शिंदे, डॉ. नितिन कुंभार, डॉ. संजय आंबेकर, डॉ. इक्बाल शाह, डॉ. पौर्णिमा तापडिया, प्रा. कैलास शिकारे, प्रा. अमोल कुलकर्णी, प्रा. दीपिका स्वामी, प्रा. अनुप कवठाळकर यांच्या समवेत कार्यालयीन कर्मचारी संभाजी बागल, रोहित क्षीरसागर, आकाश कवडे, बशीर आतार, ग्रंथपाल गायकवाड, अर्चना गरड व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top