धाराशिव (प्रतिनिधी)-  राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस छत्रपती शिवाजी हायस्कूल,धाराशिव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाषचंद्र बोस,वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच शेतकरी नेते उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मतदार जनजागरण समिती, धाराशिव यांना आमंत्रित करण्यात आले होते.  मतदार दिनानिमित्त प्रा.रवि सुरवसे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.  प्रस्तावनेत शिक्षण विस्तार अधिकारी भारत देवगुडे यांनी राष्ट्रीय मतदार दिवस व भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे महत्त्व स्पष्ट केले.  यानंतर मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. गट शिक्षणाधिकारी असरार पठाण व एम.डी.देशमुख यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.

या कार्यक्रमास मतदार जनजागरण समितीचे एम.डी.देशमुख, अब्दुल लतीफ, गणेश रानबा वाघमारे, शेख रौफ, संजय गजधने, बाबासाहेब गुळीग, सचिन चौधरी, बलभीम कांबळे,युसुफ सय्यद,श्रीकांत गायकवाड,उपप्राचार्य कुंभार,शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद विर यांनी केले. तर आभार प्राचार्य पाटील यांनी मानले.

 
Top