भूम (प्रतिनिधी)- रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कुल, भूम येथे चिमुकल्यांसोबत भाऊंनी मकर संक्रांतीचा सण साजरा केला. शाळेतील लहान मुलांना तिळगुळ आणि चॉकलेटचा गोड स्वाद आणि आशीर्वाद दिले. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद त्यांना त्यांच्या बालपणात घेऊन गेला, मनाला सुखावून गेला. महाराष्ट्र राज्य जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांनी आज शहरातील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये छोट्या मुलांसोबत मकरसंक्रांत साजरी केली.
मुले ही देवाघरची फुले असतात. निरागस, गोंडस आणि तितकीच गोड चिमुकली मुले पाहून भाऊंना त्यांच्या शाळेची आठवण झाली. भाऊंना त्यांच बालपण आठवलं. भाऊंची परिस्थिती जरी तेव्हा बेताची असली तरी बालपणाची श्रीमंती त्यांनी खूप अनुभवली आहे. आज चिमुकल्यांसोबत मकर संक्रांत साजरी करताना भाऊ पुन्हा शाळेत रमले आणि मनातून सहज पुटपुटले, “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा“
