भूम (प्रतिनिधी)-येथील जिल्हा परिषद हायस्कूल भूमला आयडीबीआय बँक शाखा भूमकडून संगणक संच प्रिंटरसह भेट देण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तात्या कांबळे होते तर प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी साहेब होते . मनोगतामध्ये भट्टी साहेब म्हणाले की , " नवीन वर्षाचा पहिला सण संक्रांत आहे .संक्रांत म्हणजे संक्रमण आज आपल्या शाळेत संक्रमण होत आहे .शाळेला बँकेकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेले संगणक साहित्य मिळत आहे . म्हणजेच शाळा प्रगतीच्या संक्रमणाकडे जात आहे .या शैक्षणिक साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नक्कीच होईल असे म्हणाले " यावेळी बँकेचे शाखाधिकारी स्वप्निल भातलवंडे ,उपशाखा अधिकारी सुनीत कुमार ,कर्मचारी अमोल चौधरी व रमेश वाघमारे यांच्या हस्ते साहित्य शाळेला सुपूर्द करण्यात आले .कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुंजाळ यांनी केले .
