तुळजापूर (प्रतिनिधी)- “देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविण्यात आलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत क्रांतीकारक ठरणार आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध मार्गदर्शक प्रा. डॉ. के. जी. घोलप यांनी मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मधुशाली कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सलगरा दिवटी येथे मंगळवार दि. 30 डिसेंबर रोजी ‌‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP -2020)‌’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. विनिल जांभळे हे होते. प्रा. डॉ. घोलप (इतिहास विभाग प्रमुख, शरदचंद्र महाविद्यालय, शिराढोण) यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून नवीन शैक्षणिक धोरणातील बारकावे, रोजगाराभिमुख शिक्षणाची संकल्पना, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन यावर सविस्तर प्रकाश टाकला. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी -2020 ची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याबाबत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत प्राचार्य प्रा. संतोष केसकर, डॉ. प्रशांत माने, हिंदी विभागप्रमुख डॉ. लक्ष्मी मनशेट्टी,तसेच प्रा. खंडेराव सूरवसे, प्रा. जयवंत काशिद, प्रा. लक्ष्मण घोडके, प्रा. सिकंदर लाटे यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन गिरी यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top