कळंब (प्रतिनिधी)- “देशासाठी जे लोक शहिद झाले त्यांच्या अथक प्रयत्नामुळे देश स्वतंत्र झाला आणि सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानामुळे देशाचा राज्यकारभार सुरु झाला. सूर्यकांत निराला, माखनलाल चतुर्वेदी इत्यादी हिंदी साहित्य कृतींचा संगोष्ठीचा विचार करता, या साहित्यकांचा राष्ट्रीय हिंदी साहित्याची चेतनांचा परामर्श घ्यायलाच हवा. त्याविषयी शंका घेणे, हे साहित्य आणि कला क्षेत्राचा माहल बिघडून जाईल. या साहित्यकांनी देशाच्या प्रति गौरवशाली भावना प्रभावी रितीन व्यक्त केली आणि जागृती केली. त्यांचे ऋण मानायलाच हवे.“ अशी भावना डॉ श्रीपाल सबनीस यांनी दोन दिवसीय शि-म. ज्ञानदेव मोहेकर माहा विद्यालय येथे केंद्रीय संस्थान आगरा (शिक्षा मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत हिंदी साहित्य में राष्ट्रीय चेतना या संबंधी उद्घाटन भाषणांत केली.
त्यांनी या प्रसंगी जयशंकर प्रसाद सुभद्रा चौव्हान रामसिंह गिरधारी साने| गुरुजी, कमै लेखर नामदेव ढसाळ आदि हिंदी मराठी लेखकांच्या लेखनासं धी विचार प्रकट करताना पुढे म्हणाले, भारतीय संविधानामध्ये धर्म संप्रदाय चा विचार नाही. तर हे संविधान सेक्युलर तत्वप्रमाणी स्वीकारते, महजबी (धर्मवादी) राष्ट्र निर्माण करणे, अत्यंत घातक माहे. भारतीय संविधान देशाचा प्राण आहे, ते भारतीयांना सर्वसमावशकतेने सुख-समाधान, सन्मानाचे जीव न अपेक्षिते, तसेच भाषा ही संस्कृतीचा आणि देशाचा-मानवतेचा व्यास असतोः ती कुणाचाही व्देष करायला शिकवित नाही. 20 या उद्घाटन भाषणापूर्वी शोधायन विशेषांक प्रबंध संपादक प्रा. दत्ता साकोळे या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले, ज्यात 120 लेखकांच्या राष्ट्रीय एकात्मविषयीचा आलेख मांडण्यात आला आहे.
प्रा. रेखा शर्मा (हैद्राबाद) यांच्या शुभेच्छा संदेशानंतर जोगेन्द्रसिंग बिसेन यांचे बीजभाषण झाले. त्यांनी कवि भूषण पासून ते वर्तमान कविच्या कवितांचा परामर्ष घेतला आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रागारोती शैपले आभार प्रदर्शनानंतर हा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. या संगोष्टीय कार्यक्रमाला विविध प्रांतातून 135 प्रतिनिधी उपस्थित झाले आहेत. कार्यक्रमानी रंगत प्रा डॉ. साकोळे यांच्या उत्कृष्ट संवलनाने झाली. रसिक श्रोते या कार्यक्रमास मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्रा. आबासाहेब बारकुल, डॉ. संजय कांबळे डॉ. फत्ताराम नायक, डॉ. डी. विद्याधर, महाविदयालयाचे प्राचार्य हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, प्रा. जयंत भोसले हे उपस्थित होते. या चर्चासत्राचे आयोजन हिंदी विभाग प्रमुख डॉ. दत्ता साकोळे, प्रा. मारुती शिंपले, प्रा. बालाजी बाबर यांनी केले. हे चर्चासत्र यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. हनुमंत जाधव, संतोष मोरे यांनी परिश्रम घेतले.
