धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या व सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असणाऱ्या  हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे यांच्या दर्ग्यास 721 व्या उरूस निमित्त श्रीपतराव भोसले हायस्कुलच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  सुधीर पाटील , मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, नूतन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक  प्रदिपकुमार गोरे, सेवानिवृत्त कर्मचारी रामभाऊ देशमुख यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली यावेळी  हापिसाब कलीम शेख,पत्रकार निसार पटेल, इरशाद शेख, शाकेत काझी, शकील शेख, रणजीत माळाळे, एजाज सय्यद, अमीर मशायक, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे, शिक्षक नासीर मोमीन,रामराजे पाटील, कलाध्यापक शेषनाथ वाघ, तसेच सर्व शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती. 

 
Top