धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव येथे हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांचा उरूस उत्साहात सुरू आहे. उरूसातील मुख्य चिरागाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे) यांच्या दर्ग्यावरून दिवे घेवून 50 फुट उंचावरून धावण्याचा थरारक चिरागा कार्यक्रम संपन्न झाला. बुधवारच्या पहाटे अजहर आशु नाईकवाडी व चॉद यासीन नाईकवाडी यांनी पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर मानकरी शैलेश कुलकर्णी यांनी दोघांचा मानाचा फेटा बांधून सत्कार केला. त्यावेळी सरफराज अब्दुल्लाह हुसेनी सज्जादे, शफीक रफिक हुसेनी सज्जादे, इकरामुल्ला हुसेनी सज्जादे, तेजस कुलकर्णी, विश्ववेश्वर कुलकर्णी, ईशान कुलकर्णी, जिल्हा वक्फ अधिकारी आमेर सय्यद, मोहसीन शेख, आदी उपस्थित होते.


चिरागाला आहे 700 वर्षांची परंपरा

700 वर्षापासून परंपरा दर्गाहच्या भिंतीवर व घुमटाच्या खाली कंगोरे बांधलेले असतात. सुमारे 50 फुट यांची उंची आहे. या उंचावर हातात पेटते दिवे (चिरागा) घेवून धावतात. आतपर्यतच्या इतिहासात कधीही यामध्ये अपघात झालेला नाही. ही प्रथा दरवर्षी उत्साहात पार पडते. उंचावरून धावत असताना पहाण्यासाठी जवळपास 30 हजारापेक्षा अधिक भाविक उपस्थित असतात. 


 
Top