कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या महान महापुरुषांच्या कार्याला उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मयुरी गायकवाड, महादेवी गायकवाड, पृथ्वी गायकवाड, सीता कांबळे, रेखा गायकवाड, सचिन वाघमारे, बळीराम वनकळस, अविनाश वाघमारे आणि समीर पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना राजमाता जिजाऊंच्या स्वराज्य उभारणीतील संस्कारांचे महत्त्व आणि स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी असलेले प्रेरणादायी विचार मांडले. अनेक विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निकम पोपट यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक प्रदीप यादव, किशोर वाघमारे, सज्जन बर्डे, रमेश अंबिरकर, नामदेव झाडे आणि सुरज राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला माता पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शुभ्रा अंबिरकर यांनी केले.

 
Top