नळदुर्ग (ंप्रतिनिधी)- नळदुर्ग पालिकेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बसवराज धरणे यांनी एम आय एम चे उमेदवार शहबाज काझी यांचा पराभव करून विजय मिळवून पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाचा झेंडा फडकवलाफ दरम्यान या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हायझाक केलेले अशोक जगदाळे हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने ही निवडणूक काँग्रेस साठी आत्मचिंतन करणारी ठरली आहे, तर अशोक जगदाळे यांनी काँग्रेस मध्ये पक्ष करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविली असली तरी या निमित्ताने जगदाळे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नाराज झालेले शहबाज काझी यांनी एम आय एम चा रस्ता निवडल्यामुळे शहरात एम आय एम चा शिरकाव झाला, दरम्यान निवडणुकीत नगरसेवकाच्या निवडणुकीत फारसा प्रभाव दिसला नसला तरी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एम आय एम चे उमेदवार शहबाज काझी हे केवळ 420.मतांनी पराभूत झाले असल्याने त्यांनी सगळ्यांनाच मोठा हादरा दिला आहे, तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि नितीन काळे यांनी योग्य रीतीने प्रचाराची धुरा सांभाळत केवळ कोणावरती टीका न करता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग मध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि पुढे करण्यात येणारे विकास कामे यावर भर देत मतदारांपुढे जाऊन मते मागितल्या मुळे या निवडणुकीत भाजपला व शिंदे सेनेला पालिका ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे, दरम्यान काँग्रेस चे उमेदवार अशोक जगदाळे यांना सन 2016 ते 2021 या कालावधी मध्ये त्यांना नळदुर्ग पालिकेची एक हाती सत्ता दिली होती पण त्या कालावधी मध्ये शहरात काय विकास कामे झाली याचा नागरिकांनी विचार करून आणि दोन महिन्यांनी केवळ सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय सण या दिवशीच नगराध्यक्ष मुंबई हून येत असल्याने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण करायची नाही असा ही विचार मतदारांनी केला, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस तीन नंबर ला गेली, तर नव्याने एम आय एम ने शिरकाव केलेल्या पक्षाला मुस्लिम समाजाने पाठबळ दिले असल्याने काँग्रेस चे अशोक जगदाळे यांची जी मुस्लिम मतदारांची भिस्त होती ती पूर्ण तुटली आणि केवळ हजार बाराशे मुस्लिम मतावरच समाधान मानावे लागल्याने अशोक जगदाळे यांना तिसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे. जगदाळे यांचे पहिले पासूनच राजकीय गणित चुकीचे होत गेल्याने आणि शेवटच्या क्षणी उमेदवारी देताना घाई गडबड ही त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली असल्याची चर्चा ही जोर धरू लागली आहे, शिवाय काँग्रेसचे या निवडणुकीत जगदाळे यांच्या नेतृत्वात 9 नगरसेवक निवडून आले असले तरी मुस्लिम वाहिल भागात मुस्लिम समाजाने नगरसेवकासाठी काँग्रेसला दिलेली पसंती नगराध्यक्ष पदासाठी अशोक जगदाळे यांना न देता ती एम आय एम पारड्यात झुकल्याने जगदाळे यांचा पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजपाचे दहा आणि शिंदे सेनेचे एक असे एकूण 11 नगरसेवक निवडून आल्याने पालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.

 
Top