तेर (प्रतिनिधी)- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी मार्फत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धेचे आयोजन उपळे दुमाला या ठिकाणी  आयोजन करण्यात आले होते.याठीकाणी तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थी यांनी विविध स्पर्धेत यश संपादन केले.

या स्पर्धेमध्ये तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील विद्यार्थी यांनी प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी समुह गीत स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला तसेच प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते सातवी समोर नृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या यशाबद्दल मुख्याध्यापक जे. के. बेद्रे  व पर्यवेक्षक एस. एस. बळवंतराव यांनी यशस्वी विद्यार्थी तसेच मार्गदर्शीका वैशाली भंडारे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण चव्हाण यांचा सत्कार केला. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top