तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या पतींना मासिक बैठकीत बसण्यास सक्त मनाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,प्रति महा होणा-या मासिक बैठकीत निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य यांनाच बैठकीमध्ये बोलण्याचा व बसण्याचा अधिकार असावा. ग्रामपंचायत सदस्यांचे पती यांना मासिक बैठकीत बसण्याचा अधिकार नाही. मासिक बैठकीत कोणीही ग्रामपंचायत सदस्य पती बसले व बोलले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य अमोल कसबे यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.