धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे राष्ट्रीय स्तरावरील नवनीत चित्रकला स्पर्धा 2025 (मास्टर स्ट्रोक) या चित्रकला स्पर्धेमध्ये इ.5 वी व 6 वीच्या एकूण 106 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. 

त्यापैकी पहिली फेरी जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक कु.स्वरा संतोष डोलारे 6वी क, द्वितीय माहेश्वरी नवनाथ सराव 6 वी ड, प्रेमदेव बालाजी खोगरे 6 वी क तसेच मार्गदर्शक कलाध्यापक शेषनाथ वाघ यांना मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, बी.बी.गुंड, सुनिल कोरडे, राजेंद्र जाधव, बालाजी गोरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक कुणाल लोंढे, हणमंत ठेले, सुनिल मोहिते यांनी परिश्रम घेतले. बक्षीस प्राप्त विद्यार्थाचे संस्थाध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आदित्य पाटील,  कलाविभाग प्रमुख कलाध्यापक शिवाजी भोसले, धनंजय देशमुख शिक्षक-शिक्षिका यांनी अभिनंदन केले.

 
Top