वाशी (प्रतिनिधी)- पवनचक्की कंपन्या व शेतकऱ्यांमध्ये मोठ्या संघर्ष सुरू झाला असून, शेतकऱ्यांच्या कुणी कैवारी नसल्यामुळे पवनचक्क्या कंपन्या शेतकऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कालीदास बाबुराव ढेंगळे, सुरेश कालीदास ढेंगळे, राहुल हरीदास ढेंगळे सर्व रा. पिंपळवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.08.12.2025 रोजी 11.00 ते 23.00 वा. सु. पिंपळगाव शिवारातील शेत गट नं 142/168 मध्ये टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीचे मनोरे उभारणीचे काम करण्याचे काम चालु असताना कंपनीचा साहित्याचा ट्रॅक्टर थांबवुन रस्त्यावर उभा राहुन कंपनीचे वाहने थांबवून ठेवून 4,50,000 असे म्हणून खंडणीची मागणी केली आहे. काम करण्यासाठी आलात तर वाहने जाळून टाकू अशी धमकी देवून शिवीगाळ केली. कामावरील रस्या जाळून व कापून 1,10,000 चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशांत गणपत शिंदे, वय 45 वर्षे, व्यवसाय खा.नोकरी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लि. रा. प्लॉट नं 774 बिलृडींग आय. प्रिस्टिन प्रोलाईफ फेज 1 शंकर कलाटे नगर सयाल हॉटेल जवळ वाकड पिंपरी चिंचवड ह.मु. मैत्री पार्क कॉलेज रोड वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.10.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 308(4), 126(2), 352, 351 (2)(3), 324(5), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.