कळंब (प्रतिनिधी)- विद्याभवन हायस्कूल, कळंब प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून सहभाग घेतला होता . त्यांनी   स्मार्ट एग्रीकल्चरल रोबोट  या विषयावर त्यांनी उत्कृष्ट असे  प्रयोगाचे सादरीकरण केले. या प्रयोगाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या मिळवलेल्या यशाबद्दल प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही जी उपमुख्याध्यापक मयाचारी व्ही एस, पर्यवेक्षक कोळी जे एन यांच्या हस्ते अरहत वाघमारे, अनुज टिप्परसे, धीरज शेंडगे, वेदांत जोशी या विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करणारे शिक्षक काझी सर ,विनोद सागर, श्रीमती बचाटे आर. आर., डी बी पवार, सुरेश चव्हाण यांचा प्रशालेच्यावतीने  सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर , संस्थेचे सचिव डॉ अशोकराव मोहेकर यांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार एस जे यांनी केले.

 
Top