धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आणि पंचायत समितीच्या गटशिक्षण कार्यालयाच्यावतीने आयेाजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या संघरत्न सुभाष नगदे याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल संघरत्न नगदे या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
धाराशिव शहरातील यशवंतराव चव्हाण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे सोमवार, 8 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये विकसित आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले होते. या प्रदर्शनात संघरत्न नगदे याने कचरा व्यवस्थापन या विषयावर सादर केलेल्या प्रयोगास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. गटविकास अधिकारी एस. एस. नलावडे, गटशिक्षणाधिकारी ए. जी. सय्यद, विस्तार अधिकारी डी. आर. हाके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
