धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजी नगर रोड, धाराशिव येथील श्री साई जनविकास कृषि महाविद्यालयमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मृदा पूजन करून करण्यात आली. “मृदा संवर्धन ही काळाची गरज असून शाश्वत शेतीसाठी सुपीक जमिनीचे रक्षण अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या सीमा सय्यद यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. तसेच त्यांनी आपल्या प्रेमा गो पालन शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती दिली. सुवर्णा घाडगे यांनी सेंदिय शेतीचे महत्व सांगितले. कृषि सहाय्यक सुषमा काळे यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजणाची माहिती दिली. मृदा शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. पल्लवी घोडके यांनी माती पाणी परीक्षनाचे महत्व व खत व्यवस्थापन या विषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले . डॉ. अमित गांधले यांनी मृदा आरोग्य संवर्धन, सेंद्रिय शेती, खत व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी “मृदा आरोग्य कार्ड” उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत शाश्वत कृषी पद्धती अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले.जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमास कृषि महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा हरी घाडगे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील भालेकर यांनी केले तर आभार डॉ. सागर बुरगुटे यांनी मानले.
