धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषदेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवर आदिवासी पारधी समाजातील रणरागिणींना जनतेने कौल देवून भरघोस मतांनी विजयी केले आहे. समाजातील उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणारे आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे हे या निवडणुकीत गेमचेंजर ठरले आहेत. या यशाबद्दल नूतन नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, वंदना बापू पवार, शालाबाई शिवा पवार, सुरेखा दत्ता काळे यांचा सुनील काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 
Top