मुरुम (प्रतिनिधी)- दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील बीएससी, एनसीसी प्रथम वर्गात शिकत असलेल्या हर्षवर्धन कदेरे चा सत्कार करण्यात आला. त्याची डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली होती. 37 व्या महाराष्ट्र आंतर विद्यापीठ महोत्सव 2025 पार पडल्या. या स्पर्धा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दि .4 ते 8 डिसेंबर 2025 रोजी या कालावधी मध्ये संपन्न झाल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकुण 25 व्हॉलीबॉल विद्यापीठ संघानी सहभाग घेतला होता या स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संघानी प्रथम क्रमांक मिळवुन सुवर्ण पदक प्राप्त केले . या बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अश्लेष मोरे यांनी सुवर्ण पदक देऊन सत्कार केला या प्रसंगी शुभेच्छा देत असताना अश्लेष मोरेंनी हषवर्धन नी येथेच न थांबता राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी व्हॉलीबॉल संघात सहभाग घ्यावा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चांगला कर्तव्यदक्ष्य अधिकारी बनुन समाजाची सेवा करावी असे आव्हान केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले,डॉ पदमाकर पिटले खेळ विषयाचे विभाग प्रमुख प्रा विजय पवार, डॉ राजू सूर्यवंशी, कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, प्रा शेखर दाडगे, नितीन कोराळे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
