कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना (उबाठा) चे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रा. संजय कांबळे, तसेच उबाठा शिवसेना शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मालोजी पाटील (इटकुर), हनुमंत जाधव (डिकसळ), भालेकर, अरुण मुंडे, सलीम शेख यांनी आज शिवसेनेवर विश्वास ठेवत सामूहिक पक्षप्रवेश केला.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासयात्रा, लोकहितासाठीची निर्भीड निर्णयक्षमता, समस्यांवर तातडीने प्रतिसाद देण्याची भूमिका आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी या भावनेतून हा पक्षप्रवेश झाल्याचे मान्यवरांनी सांगितले. या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, कळंब तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनंत लंगडे, अश्रुबा रणदिवे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
