उमरगा (प्रतिनिधी)- युवा कार्यप्रशिक्षण योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान घेण्यासाठी ही योजना राबवली आहे. पण आता त्या लोकांना त्यांनी वारंवार सोडले असून, त्या लोकांच्या आंदोलनावर लाठी चार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. असा आरोप उबाठा शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी उमरगा येथील पत्रकार परिषदेत केला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विविध महत्त्वाचे प्रश्न मांडल्याचे सांगत आमदार प्रविण स्वामी यांनी राज्यातील असा एकमेव लोहारा तालुका असून, शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीचा तांत्रिक अडचणीचा प्रश्न आहे. उमरगा- लोहारा तालुक्यातील तलाठी कार्यालयाची अनेक प्रलंबित प्रश्न मांडले आहेत. आश्रम शाळेचे थकित अनुदान द्यावे, पोलीस पाटील यांची शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेनुसार नेमणूक करावे, 1993 च्या भूकंपानंतर 1995 पर्यंत पुनर्वसनाची कामे झाली. परंतु नंतर त्या गावांना कसलाही भरीव निधी मिळालेला नाही त्या गावांना विशेष पॉकेज द्यावे. शेती संदर्भात राज्य शासनाच्या योजना असून, नगरपालिका नगरपंचायत मध्ये मोडतात म्हणून त्या योजना त्यांना लागू नाहीत तशी तरतूद करावी, महसूल विभागाकडे मागणी केल्याची माहिती त्यांनी सांगितले आहे.
भूकंपग्रस्त कर्मचाऱ्यांच्या वयामध्ये वाढ व्हावे, पंचायत समिती, महावितरण, महसूल मोजणी, आरोग्य विभाग, जलसंपदा या शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असून, रिक्त पदाची माहिती काढून शासनाने ती पदे लवकरात लवकर भरावे. राज्यातील नगरपालिका नगरपंचायत मध्ये कंत्राटी स्वरूपात कर्मचारी भरले आहेत. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना नोकरीत कायम घ्यावे. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला शंभर टक्के अनुदान द्यावे. या आयोजित पत्रकार परिषदेला शैलेश नागणे, बालाजी सुरवसे, शिवकांत पतंगे आदी उपस्थित होते.
