तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरात रस्त्याच्या कामावरून भाजप, महाविकास आघाडीत दोन राजकीय गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना  मंगळवार 16 डिसेंबर रोजी घडली. या हाणामारीच्या घटनेत एकाच्या डोक्यावर कतीने वार करण्यात आलाने गंभीर जखमी झाला असुन. त्यास पुढील उपचारार्थ सोलापूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटने नंतर शहरात तणावाचे वातावरण र्निमाण हावुन गोलाई, पंचायत समिती परिसराती दुकाने बंद झाली होती. पंचायत समिती समोरील रस्त्याच्या कामावरून हा वाद झालाच समजते. या राड्यामुळे तुळजापुरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील मुख्य वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूरचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात हा वाद झाला. गोलाई चौकातील पंचायत समिती परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. पाहता पाहता या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.  या घटनेमुळे रस्त्यावर नागरिकांची आणि बघ्यांची प्रचंड गर्दी जमली. दोन्ही गटांच्या कार्यकते मोठया संखेने जमा झालाने तुळजापूर- धाराशिव-नळदुर्ग रस्ता ब्लॉक झाला. यामुळे सलग दोन तास वाहतूक कोंडी झाली होती. ज्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

प्रथम विनोद गंगणे, रुषी मगर मध्ये शाब्दीक चकमक होवून हाणामारी झाली. नंतर दोघांचे समर्थक गेल नंतर कुलदीप मगरवर अज्ञाताने कत्तीने डोक्यावर वार केलाने त्यांना जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात  दाखल करण्यात आले. गंभीर परिस्थिती पाहता सोलापूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले.   

 
Top