धाराशिव (प्रतिनिधी)-  एमएसआरडीसी मार्फत राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (पॅकेज) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात पर्यावरणीय सार्वजनिक सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.ही सुनावणी मंगळवार,दि.23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे होणार आहे.

या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एमएसआरडीसी कडून प्राप्त पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन एमएसआरडीसी अहवाल तसेच सविस्तर माहिती संबंधित सर्व गावांमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक परिणाम नागरिकांना समजून घेणे सुलभ झाले आहे. या प्रकल्पांतर्गत धाराशिव तालुक्यातील नितळी,घुगी,लासोना, सांगवी,कामेगाव,चिखली,महालिंगी, बरमगाव बु.,मेडसिंगा,धाराशिव ग्रामीण, देवळाली, शेकापूर, गावसुद, वरवंटी, पोहनेर,बेगडा व सुर्डी या गावांचा समावेश आहे. या गावांतील प्रकल्पग्रस्त व नागरिकांनी प्रकल्पाबाबतच्या आपल्या लेखी सूचना, मते व आक्षेप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालय,लातूर तसेच संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे तात्काळ सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.

या लोकसुनावणीदरम्यान नागरिकांना आपल्या समस्या,सूचना व भूमिका मांडण्याची संधी मिळणार असून त्या नोंदी अंतिम निर्णय प्रक्रियेसाठी विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित सर्व गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक कार्यालय लातूरचे सब रिजनल ऑफिसर यांनी केले आहे.

 
Top