भूम (प्रतिनिधी)- भूम नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वाढलेली टक्केवारी कोणत्या आघाडीला मारक ठरते व कोणत्या आघाडीला तारक ठरते हे पुढील काळात स्पष्ट होणारच आहे. मात्र विधानसभेपेक्षाही नगरपरिषद निवडणुकीसाठी भम शहरातील मतदारांनी भरघोस असे मतदान केले आहे. त्यामुळे निकालाचा तर्क वितर्क काढताना कार्यकर्त्यासह नेत्यांनाही अडचण निर्माण होत आहे. मागील काही निवडणूक झाल्यानंतर लगेच कोणत्या आघाडीचे किंवा पक्षाचे पारडे जड आहे हे लक्षात येत होते. मात्र या निवडणुकीमध्ये दोन्ही आघाडीची प्रचार यंत्रणा सर्व बाबतीमध्ये आघाडीवर होती त्यामुळे कोणत्या आघाडीचे पारडे जड आहे हे कळून येत नाही.भूम येथील 21 मतदान केंद्रावर याप्रमाणे मतदान झाले आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक एक 1209, प्रभाग क्रमांक दोन 1205 ,प्रभाग क्रमांक तीन 901 ,प्रभाग क्रमांक चार 1467 ,प्रभाग क्रमांक पाच 1607 ,प्रभाग क्रमांक सहा 2028 ,प्रभाग क्रमांक सात 1484 ,प्रभाग क्रमांक आठ 1665 ,प्रभाग क्रमांक नऊ 1498, प्रभाग क्रमांक दहा 1254 एकृण 14318 मतदान झाले आहे. संपूर्ण प्रभागांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे .त्यामुळे बाहेर गावा करून येणाऱ्या मतदानामध्ये या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या वाढलेली दिसत आहे.

या बाहेरगावाहून आलेल्या मतदारांनी केलेल्या मतदानावरच दोन्ही आघाडीचे मोठ्या प्रमाणावर निवडून येण्याचे संकेत स्पष्टपणे आकडेवारीवरून दिसत आहेत .शहरातील चौकाचौकांमध्ये आपल्याच प्रभागांमध्ये कार्यकर्ते व नागरिक या आघाडीला किंवा त्या आघाडीला आपला प्रभाग मारक ठरेल अशी चर्चा भूम शहरात होताना दिसत आहे . दरम्यान शहरातील मतदाराने मतदान करताना मतदानामध्ये जी वाढ दिली आहे ती नेमकी सत्ताधारी असणाऱ्या संजय गाढवे यांच्या अममप्रभु विकास आघाडी लाख की विरोधी राजे श्रीमंत विजयसिंह थोरात यांच्या जनशक्ती विकास आघाडीला आहे. हे येत्या 21 डिसेंबरला करणार आहे याबाबत शहरात पैजाच्या पैजा लागलेल्या आहेत.


 
Top