भूम (प्रतिनिधी)- कॉलेजमध्ये एकूण 1700-1800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच रस्त्याने कुसुमनगर, विद्यानगर, अविनाशनगर याभागातील विद्यार्थी शहरातील विविध शाळेत चालत किंवा सायकल वर रस्ता क्रॉस करत असतात. त्याठिकाणी महाविद्यालय असल्याचा बोर्ड नाही किंवा गतिरोधकही नाही.वेगाने वाहने येतात, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे सहसचिव डॉ संतोष शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.

तसेच कॉलेजच्या समोरील रोडवर नगरपरिषदेने/पोलीस विभागाने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत ते सुद्धा सुरू करावेत अशी मागणी होत आहे.


 
Top