भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. महेश सुर्यवंशी यांना “त्रेतायुग फाउंडेशन” संस्थेकडून त्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय आणि अतुलनीय योगदानाची दखल घेऊन “TY National Icon 2025 ” हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या बहुमानाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी प्रा. सुर्यवंशी यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी बोराडे, तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ. गव्हाणे किशोर उपस्थित होते. प्रा. महेश सुर्यवंशी यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या मिळालेल्या राष्ट्रीय सन्मानामुळे महाविद्यालयाचे नाव आणखी उज्ज्वल व लौकिक झाले आहे.
