भुम (प्रतिनिधी)-  परंडा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचे सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते  पुण्यामधील टीचिंग लर्निंग कम्युनिटी या संस्थेने  परंडा तालुक्यातील या पूरग्रस्त शाळांना भरीव मदत करून मोठा आधार दिला आहे. परंडा तालुक्यातील 09 पूरग्रस्त शाळांना जवळजवळ 25 लाख रुपयाची शैक्षणिक मदत टीचिंग लर्निंग कम्युनिटी पुणे या संस्थेने केली आहे. यामध्ये स्वच्छतागृह, संगणक,स्मार्ट टीव्ही, टॅब,डिजिटल बोर्ड अशा अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप या संस्थेच्या माध्यमातून शाळांना करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव खुर्द या ठिकाणी हा साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी परंडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी हाके साहेब हे अध्यक्षस्थानी होते तसेच शिवाजी पुजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी पिकवणे, टीएलसी या संस्थेचे सुहास शिंदे,बाळासाहेब जोगदंड, ज्ञानेश मोरे, संतोष नाईक, शिवानंद बनसोडे, पांडुरंग जीतकर,धनाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश डांगे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले खासापुरी, देऊळगाव, तांदूळवाडी, शेळगाव, देवगाव खुर्द, लाखी, हिंगणगाव बुद्रुक, सिरसाव, साडेसांगवी या 9 पूरग्रस्त शाळांना भरीव मदत करण्यात आली. यामध्ये एकूण 03 स्वच्छतागृहे, 16 कॉम्प्युटर, 06 स्मार्ट टीव्ही, 44 टॅब,आणि  02  डिजिटल बोर्ड हे साहित्य शाळांना देण्यात आले. 


 
Top