तेर (प्रतिनिधी) धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री शिवमहपुराण व किर्तन महोत्सवास उत्साहाने प्रारंभ झाला.दुपारी श्रीधाम वृंदावन येथील हभप आकाशकृष्णा महाराज शास्त्री यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी भाविक भक्त यांनी प्रचंड गर्दी केली होती.
सर्व प्रथम गणपती पूजन,कलश पूजन, श्री संत गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन, ध्वज पूजन,दिप पूजन,ग्रंथ पूजन,टाळ पूजन, मृदंग पूजन,विणा पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शिवाजीराव नाईकवाडी, पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, बाबुराव नाईकवाडी,भारत नाईकवाडी,दिपक नाईकवाडी, व्यंकट माळी,महादेव खटावकर, संजय जाधव, राजाभाऊ आंधळे, महसूलचे तेर मंडळ अधिकारी शरद पवार,तेरचे ग्राम महसूल अधिकारी प्रशांत देशमुख, अप्पासाहेब चौगुले, अमोल थोडसरे, डॉ.बालाजी खराडे, अभिमान माने, महादेव शेळके,संभाजी कांबळे, अभिमान रसाळ,ॲड.अजय कांबळे, चंद्रकांत माळी, दिलीप आंधळे, अजित लाकाळ, सचिन पांढरे,भागवत भक्ते, नानासाहेब भक्ते, हर्षवर्धन चौगुले, श्रीमंत तेरकर, बप्पा जाधव, साहेबराव मेटे, अविनाश पाडुळे,रूपचंद नाईकवाडी, भाऊराव जाधव, बिभीषण नाईकवाडी, धनंजय हाजगुडे, अमोल खांडेकर, संजय नाईकवाडी,विठ्ठल खरात,हिज्जू काझी, संयोजक हभप रघुनंदन महाराज पुजारी व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
