धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दमदार कामगिरी करत एकूण आठ नगरसेवक विजयी केले आहेत. या निकालामुळे धाराशिव शहरातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर आपला ठाम विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत पक्षाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत
प्रभाग क्रमांक 1 ब : निसाबी मसुद कुरेशी, प्रभाग क्रमांक 9 अ : रूपाली सुनील आंबेकर, प्रभाग क्रमांक 14 अ व ब: अर्चना विशाल शिंगाडे व आयाज उर्फ बबलू शेख, प्रभाग क्रमांक 16 अ व ब: शकुंतला अशोक देवकते व खालील गफूर कुरेशी, प्रभाग क्रमांक 17 व 18 अ व ब : इस्माईल बाबासाहेब शेख व काझी शमीम बेगम, तसेच या निवडणुकीत खलिफा कुरेशी यांनी अत्यंत प्रभावी व लढाऊ प्रचार करत 18 हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
या यशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच या विजयासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या धाराशिव शहरातील मतदारांचे मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले. या निवडणूक निकालामुळे आगामी काळात धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अधिक जोमाने कार्य करेल, असा विश्वासही डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
