तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील मतमोजणीच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याची जाणीव करून देण्याऐवजी, प्रशासनाने जणू अडथळ्यांचीच भिंत उभी केली.
तुळजापूर येथे मतमोजणीचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यां ने केंद्र प्रवेशद्वारावर थांबवले थांबा तुम्हाला पुन्हा सोडतो म्हटले, अधिकृत ओळखपत्रे असतानाही अनेक पत्रकारांना गेटबाहेर रोखून ठेवण्यात आले. या गोंधळामुळे प्रत्यक्ष घडामोडींपेक्षा अंदाजावर बातम्या देण्याची वेळ पत्रकारांवर आली. निवडणूक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेमधील समन्वयाचा अभाव उघड झाला आणि त्याची किंमत माध्यमांना मोजावी लागली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाशी असा दुजाभाव करणारा हा प्रकार म्हणजे बेफिकीर वृत्तीचे जिवंत उदाहरण आहे. भविष्यात तरी माध्यमांसाठी योग्य नियोजन होणार का? असा सवाल आता उपस्थित होतोय.
