नळदुर्ग (प्रतिनिधी)- नगरपालिकेची निवडणूक होऊन भारतीय जनता पक्षाने घवघवित यश संपादन केल्यानंतर सोमवार (दि.२९) रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले बसवराज विजयकुमार धरणे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. पालिका प्रवेशद्वार, नगराध्यक्ष यांचे दालन आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.
नळदुर्गच्या जनतेने मतरूपी जो विश्वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त करत नळदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग निहाय १०० दिवसाचा कार्यक्रम जाहीर करून त्याप्रमाणे विकास कामांची सुरुवात करू असे आ.पाटील बोलताना म्हणाले. तत्पुर्वी नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक नय्यरपाशा जाहगीरदार,दत्तात्रय दासकर, शशिकांत पुदाले, तानाजी जाधव, रिजवान काझी, निरंजन राठोड सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. नळदुर्गच्या विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेऊ असा गर्भित इशारा देत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करण्याची विनंतीवजा सुचना केली. कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपचे नेते सुनील चव्हाण, नितीन काळे, अर्चना पाटील, भाजपचे युवा नेते मल्हार पाटील यांच्यासह महिला नगरसेविका छमाबाई राठोड, राणी सुरवसे, सुमन ठाकूर, साक्षी नळदुर्गकर, सुशांत भुमकर, विलास राठोड, संतोष बोबडे, सिध्देश्वर कोरे, किशोर नळदुर्गकर, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, सूरज गायकवाड, पल्लवी पाटील यांच्या सह नवनिर्वाचित नगरसेवक, भाजप पदाधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची अतिषबाजी केली. यावेळी साहेबराव घुगे, सुधीर हजारे, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, पद्माकर घोडके, अजय देशपांडे आदी उपस्थित होते.