धाराशिव (प्रतिनिधी)- नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस आघाडीच्या वतीने जनतेचा विश्वास संपादन करून विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमुख नंदू राजेनिंबाळकर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव तसेच माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन अक्षय लक्ष्मण जोगदंड, सचिन उर्फ राजाभाऊ पवार, सोनाली अमित उंबरे, प्रदीप प्रभाकर मुंडे, संतोष उर्फ नाना घाटगे, सिद्धार्थ अंगुल बनसोडे,  सौ. केशरबाई ज्ञानदेव करवर, सौ. सोनाली रविंद्र वाघमारे, सौ. ज्ञानेश्वरी अजित (राज) निकम या सत्कार समारंभास उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, रवी वाघमारे, अजित निकम, अजहर पठाण, अमित उंबरे, करवर व सत्यजीत पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.

जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, स्वच्छ व लोकाभिमुख कारभार घडवून आणण्याची जबाबदारी या नवनिर्वाचित नगरसेवकांवर आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली धाराशिव शहर निश्चितच प्रगतीच्या नव्या दिशेने वाटचाल करेल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 
Top