भूम (प्रतिनिधी)- विविध पक्षाच्या मंत्री आणि आमदाराकडून वेळोवेळी दिशाभूल करून निधी आणणाऱ्यानी विरोधकाचा एक जरी नगरसेवक निवडून आला तरी राजीनामा देणार असल्याची वलगणा करणाऱ्यांनी 14 नगरसेवक निवडून आल्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा. असे आवाहन भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांनी नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी बोलताना केले.
सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 भूम नगर पालिकेच्या जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नूतन 14 नगरसेवकांचा सत्कार भाजपच्या कार्यालयात करण्यात आला, यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकुर , माजी आमदार राहुल मोटे, माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सत्वशीला थोरात, यशवंतराव थोरात, दिलीप शाळू महाराज, सिताराम वनवेसर, महादेव वडेकर, सौ शामलताई क्षिरसागर, ॲड अमृता गाढवे , बाजार समिती संचालक विकास जालन महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी भाजपचे मा.आ. सुजितसिंह ठाकूर, रा. काँ. मा. आ. राहुल मोटे यांनी अल्पमतांनी निवडून आलेल्या नेत्यांवर नाव न घेता आरोप प्रत्यारोपाची मोठी सरबती केली, यावेळी त्यांनी जनतेला जाहीर सभेत दिलेला शब्द पाळावा, विरोधकांचे एकही उमेदवार नगरसेवक निवडून येणार नाहीत, एक जरी निवडून आला तर राजीनामा देऊ असे जाहीर केले होते, आज 14 नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे आवाहन केले . ज्यांनी वेळोवेळी विकास निधी दिला त्या एकाही आमदारा बरोबर राहिला नाही, प्रत्येका बरोबर धोकेबाजी केली. ते जनतेलाही धोकाच देतात, म्हणूनच जनतेने यावेळेस जनशक्ती नगर विकास आघाडीलाच कौल दिल्याचं आवर्जून सांगितलं .
यावेळी जनशक्ती नगर विकास आघाडीचे नगसेवक चंद्रमणी गोरख गायकवाड, शमशाद हरून मुजावर , शितल अमोल गाडे, रुपेश परमेश्वर शेंडगे, चंद्रकला हरिश्चंद्र पवार, नवनाथ विलास रोकडे , लक्ष्मी प्रशांत साठे आबासाहेब धोंडीराम मस्कर, नूरजहा मोहम्मद ईसार मणियार , अनिल नामदेव शेंडगे, विठ्ठल महादेव बागडे, सुनिता गणेश वीर, सुरेखा दत्ता काळे, रामराजे बाळू कुंभार यांचा सत्कार केला. दरम्यान नगरसेवक पदासाठी अल्प मतानी हुलकावणी मिळालेल्या सुनिता साठे, तानाजी साबळे, प्रेमानंद महाजन, मनिषा नाईकवाडी, राणी यादव, वाहेद कुरेशी यांचाही सन्मान केला.
कार्यक्रमासाठी भाजपचे शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, प्रभाकर शेंडगे, सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, शुभम खामकर, संदीप खामकर, हेमंत देशमूख, बापू बगाडे, आदींनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर खामकर यांनी केले तर आभार भाजप ता. अध्यक्ष संतोष सुपेकर यांनी मांनले.
