कळंब (प्रतिनिधी)- शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब ,आयक्यूएसी विभाग व श्री.शिवाजी शिक्षण संस्था,द्वारा संचालित महात्मा फुले कला,वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय,वरुड जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 10:00 वा. 'क्रांतीदर्शी डॉ.पंजाबराव देशमुख यांची समग्र क्रांती व भारतीय संविधानातील योगदान' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालयात करण्यात आले होते. प्रथम कार्यक्रमाची सुरवात कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा.डॉ.राजेश मिरगे(संत साहित्य व शिवचरित्र अभ्यासक,श्री.शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती)  मा.प्रा.डॉ.दिलीप हांडे (प्राचार्य,महात्मा फुले कला वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरूड) संस्थेचे सहसचिव प्रा. संजयजी घुले,कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष मा.प्रा.डॉ. हनुमंत माने (प्राचार्य, छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब)प्रा.कदम सर, आयक्युएसीसमन्वयक डॉ. अनिल जगताप व रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. मनिषा कळसकर या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख व संस्थेचे संस्थापक कै. नरसिंग (आण्णा)जाधव यांच्या प्रतिमांचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा यशोचित सत्कार महाविद्यालयाच्या वतीन करण्यात आला.महात्मा फुले कला,वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य.प्रा. डॉ.दिलीप हांडे यानी त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सहसचिव प्रा.संजयजी घुले व प्राचार्य. डॉ.हनुमंत माने याना डॉ. पंजाबराय देशमुख यांची प्रतिमा व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.राजेश मिरगे यानी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या राजकीय,सामाजिक,कृषि तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यांचे तसेच त्यांचे विचार या विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य.डॉ.दिलीप हांडे यानी केले.त्यानी या कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी प्रास्ताविक केले. कार्यकमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.हनुमंत माने यांनी केला.सुंदर असे सुत्रसंचालन प्रा.मनिषा कळसकर यानी केले.आभार प्रा.राजाभाऊ चोरघडे यानी मानले.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
Top