धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा समाजाच्या हक्कांसाठी अखंड संघर्ष करणारे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आज दिल्लीत आगमन झाले. त्यांच्या या आगमनावेळी रूपामाता परिवाराचे संस्थापक अँड.व्यंकट गुंड पाटील तसेच प्रभारी भाजपा दिल्ली प्रदेश (मराठी प्रकोषठ) तथा श्री गणेश सेवा मंडळ, लक्ष्मीनगर (दिल्ली) चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र लड्डा यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी हरियाणाहून आलेले शिष्टमंडळ पारंपरिक भगवे फेटे परिधान करून स्वागतासाठी उपस्थित होते. स्वागतानंतर मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत शेकडो वाहनांचा ताफा न्यू महाराष्ट्र सदनच्या दिशेने रवाना झाला. या प्रसंगी मराठा समाजातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
