धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली,बैठकीपुर्वी समितीच्या वतीने रुग्णालयातील विभागात पाहणी करण्यात आली, स्वच्छता,सुरक्षा रक्षक,हॉटेल,ओपिडी व इतर ठिकाणी पाहणी केली असता संबंधितांना सुचना देण्यात आल्या, पाठीमागील बैठकीतील इतिवृत्ताचे स्मरण करुन अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.तसेच मेट्रान सुमित्रा गोरे यांना सोलापूर येथील सोनुबाई आवटे सेवानिवृत्त अधिसेविका व करुणाशिल बहुउद्देशीय सामाजिक संस्था व करुणाशिल समिती सोलापुरच्चा वतीने राज्यस्तरीय करुणाशिल पुरस्कार देण्यात आला,तर सामाजिक कार्यकर्ते नवनाथ सरवदे यांनी दोन महिन्यापासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या निराधार महिलेची काळजी घेतली व सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कांबळे यांच्या माध्यमातून मातोश्री वृद्धाश्रम धाराशिव येथे सोय केली या मानवहिताच्या कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा वैद्यकशास्त्र डॉ.विश्वजीत पवार,सचिव तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ,सदस्य अब्दुल लतीफ,सदस्य गणेश वाघमारे, आरोग्य मित्र रौफ शेख,पोलीस निरीक्षक नजिरोद्दीन नाईकवाडी, सुनिल जोगदंड,बाळासाहेब जावळे,मेट्रान सुमित्रा गोरे,मेट्रान ढोणे मॅडम,विद्दुलता पांचाळ,समाज सेवा (वैद्यकीय) अधिक्षक नवनाथ सरवदे,महेश गोपाल अटकळ,मुरकुटे,बांधकाम विभाग शशीकांत अंकुशे,सह इतर उपस्थित होते.


 
Top