उमरगा  (प्रतिनिधी)- साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आदर्श विद्यालय, उमरगा येथे साने गुरुजी कथामालेचे पहिले पुष्प गुंफले. या कार्यक्रमासाठी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर हे या कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक शैफान शेख, ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरीचे मुख्याध्यापक श्रीहरी जाधव, हिरालाल पवार, रोटी क्लबचे माजी अध्यक्ष  रो. कमलाकर  भोसले, प्रा. रो. सोमशंकर महाजन, आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माने, आदर्श विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीपाद कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रा. धनंजय मेनकुदळे, क्लबचे सचिव प्रा. राजू जोशी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. 

कार्यक्रमाची प्रस्तावना क्लबचे अध्यक्ष डॉ. मेनकुदळे यांनी केली. शाळेचे मुख्याध्यापक शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्रीहरी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साने गुरुजी कथामालेचे प्रोजेक्ट चेअरमन कमलाकर भोसले यांनी सावित्रीचे व्रत ही पहिली कथा विद्यार्थ्यांना सांगून त्याचा फीडबॅक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेतला. प्रश्नोत्तर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवून बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक पुस्तक यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी अध्यक्षीय समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजू जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा.रो सोमशंकर महाजन यांनी केले. अशारीतीने एका सुंदर वातावरणामध्ये कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


 
Top