भूम (प्रतिनिधी)-  भारतीय राज्यघटनेची प्रस्ताविका नगर परिषद कार्यालय भूम समोर मार्बल मध्ये कोरून लावण्यात यावी. याबाबतचे निवेदन रिपब्लिकन सेना भूम तालुकाच्या वतीने मुख्य अधिकारी नगर परिषद भूम यांना देण्यात आले.

निवेदन पुढे म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारताचे संविधान महत प्रयासाने तयार करून या संविधानाच्या माध्यमातून देशातील विविध जाती, पंथ,धर्म, देश यांना जोडण्याचं काम केले आहे. एकसंघ भारत याच माध्यमातून निर्माण झाला आहे म्हणून जगाने या संविधानाविषयी सर्वश्रेष्ठ घटना असल्याचे कबूल केले. समता स्वातंत्र्य बंधुत्व या मूल्याचे यामध्ये अंतर्भाव केला आहे. या विषयी निवेदन देण्यात आहे. या  निवेदनावर मुकुंद लगाडे भूम तालुकाप्रमुख, सुभाष जावळे तालुका महासचिव, प्रशांत शिंदे शहराध्यक्ष, पंचशील गायकवाड, शिद्धोधन सरवदे, नारायण मस्के, राजा जाधव यांच्या सह्या आहेत.


 
Top