भूम (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून 90 कोटी रुपये विविध प्रकारचे अनुदान वाटप करण्यात आले असून अनुदान वाटप अंतिम टप्प्यात असल्याचे तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले.

यामध्ये जुलै, ऑगस्टमधील नुकसानी पोटी 43276 पैकी 35249 शेतकऱ्यांना 22 कोटी 62 लाख, सप्टेंबर मधील 49250 पैकी 39420 शेतकऱ्यांना 16 कोटी 93 लाख तसेच जमीन खरडून गेलेल्या 4875 पैकी 3796 शेतकऱ्यांना 4 कोटी 1 लाख व रब्बी हंगामासाठी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी 75178 शेतकऱ्यांना  प्रती दहा हजार प्रमाणे 47 कोटी 58 लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. तसेच जनावरे वाहून जाणे याचेही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्या त्याची महसूलच्या वतीने सांगण्यात आले. तसेच फार्मर आयडी, पीकेवायसी, सामूहिक कुटुंब सहमती न दिल्यामुळे जुलै, ऑगस्ट मधील 9830, सप्टेंबर मधील 8027  तसेच सप्टेंबरमधील जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांपैकी 1079 अद्यापही राहिलेले आहेत. अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकऱ्यांनी ईकेवायसी, फार्मर आयडी, सामूहिक क्षेत्रातील संमती पत्र दाखल करून अनुदान जमा करून घेण्याची आवाहन महसूलच्या वतीने करण्यात येत आहे. भूम तालुक्यातील एकूण आयडी धारक फार्मर 55530 असून नोंदणी झालेले आयडी धारक 43 हजार 879 आहेत तर 11651 फार्मर हे आयडी पासून वंचित राहिलेले आहेत.

 
Top