धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मशिनरी व ड्रीप असोसिएशनच्या अध्यक्षपदी शैलेश शहा व सचिवपदी श्रीकांत शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या असोसिएशनच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्षमीकांत जाधव, महाराष्ट्र कैटचे उपाध्यक्ष संजय मंत्री व मावळते अध्यक्ष अविनाश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी असोसिएशनच्या एकजुटीबध्दल व पारदर्शक कामाबद्दल कौतुक करून व्यापारी महासंघ सोबत नेहमीच आहे, असे आश्वासन दिले. मावळते अध्यक्ष अविनाश काळे यांनी आपल्या कार्याचा आढावा मांडला व कार्यकाळातील सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
नूतन अध्यक्ष शहा यांनी विविध समस्यांचा उहापोह करून अडचणींवर उपाय काढण्याचे आश्वासन दिले. व सर्वांना सहकार्याची विनंती केली. याच बैठकीत उपाध्यक्षपदी मिलींद गांधी, किरण खडके तर कोषाध्यक्षपदी सुहास मंडगे यांची तर सहसचिवपदी दिगंबर सारडे यांची निवड करण्यात आली. कार्यकारी सदस्यांमध्ये कुणाल मेहता, नितीन देशमुख, नरेंद्र कुलकर्णी, गिरीष अष्टगी, नामदेव चव्हाण, ओनराम चौधरी यांची निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन देशमुख तर आभार श्रीकांत शिंदे यांनी मानले.