उमरगा (प्रतिनिधी)- सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी दि. 21 डिसेंबर रोजी अंतुबळी पतंगे सभागृहात संपन्न झाली. या निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे व काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण गायकवाड यांनी 11660 मते घेत दणदणीत विजय मिळविला. तर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हर्षवर्धन चालूक्य यांना 5376 मिळून यांचा 6284 मतांनी पराभव झाला. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रजाक अत्तार यांना तीसऱ्या क्रमांकांची 4013 मते मिळाली.
नगरसेवक पदासाठीसुध्दा शिवसेना शिंदे गटाने बाजी मारत 12 जागा मिळवल्या. तर त्यांच्या सोबत असलेल्या आघाडीचे काँग्रेस पक्षाने 6 जागा मिळवल्याने त्यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. भारतीय जनता पक्षाला 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितद पवार गट यांना 2 जागेवर यश मिळाले. उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला मात्र या निवडणुकीत एकही जागा न मिळाल्याने दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
