भुम (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या 202526 वर्षासाठीच्या शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षणाचा अहवाल जाहीर झाला असून शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम यांनी यामध्ये ब+ हा गुणदर्जा मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महाविद्यालयाने एकूण 450 पैकी 280 गुण मिळवत अभ्यासक्रम, अध्यापन-शिकवणी, संशोधन, विद्यार्थी समर्थन, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्य या विविध निकषांमध्ये सक्षम कामगिरी नोंदवली आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनुराधा जगदाळे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “हा निकाल संपूर्ण महाविद्यालयीन परिवाराच्या एकत्रित परिश्रमाचे फलित आहे. संस्थेचे सततचे समर्थन, शिक्षक-कर्मचारी यांची निष्ठा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग आमच्या गुणवत्तावृद्धीला बळ देतो. पुढील लेखापरीक्षणात अधिक उच्च स्तर साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे मन:पूर्वक अभिनंदन केले व गुणवत्ता वृद्धी उपक्रमांना संस्थेकडून कायमचे समर्थन राहील, असे आश्वासन दिले. या संपूर्ण प्रक्रियेचा समन्वय डॉ. सुरवसे गोकुळ सर यांनी केला, तर असिस्टंट समन्वयक म्हणून डॉ. तावरे राजश्री मॅडम यांनी प्रभावीपणे काम पाहिले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. तानाजी बोराडे व प्रा. डॉ. गव्हाणे किशोर हे मान्यवरही उपस्थित होते. संस्थेचे सहसचिव डॉ. संतोष शिंदे यांनी सर्वांचे अभिनंदन करत हा निकाल प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. पडवळ नितीन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. तिजारे गौतम यांनी मानले. समारोप प्रसंगी उपस्थित प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने आगामी वर्षात आणखी उंची गाठावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 
Top