धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि.चे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (दि.3) कारखानास्थळी विविध उपक्रमाने अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

चेअरमन पाटील यांच्या संकल्पनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने कर्मचार्‍यांना थंडीपासून सुरक्षेसाठी ट्रायसूट, ऊस वाहतूक वाहनांना रिफ्लेक्टर, कपडा तसेच सुशोभिकरणासाठी कारखान्याच्या विविध विभागास वृक्षाच्या कुंड्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशी, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, सिव्हिल इंजिनिअर विश्वास पाटील, फोरमन विजय वाघे, प्रवीण पाटील, बॉयलर विभाग अजय गाडे, सुधाकर खोत, सुरक्षा अधिकारी मेजर चंद्रकांत पवार, परचेस अधिकारी रवि जोगदंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, दत्तात्रय टेकाळे, गोडाऊन किपर सुरेंद्र गिरी, राजाभाऊ केवळराम, अक्षय माने, प्रज्योत माने, बालाजी गुळवे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top