धाराशिव (प्रतिनिधी)- माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजसिंह पाटील चाकूरकर यांच्या निधनाने राज्याचे तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक सभ्य, संयमी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले आहे. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात राहून त्यांनी लोकसंपर्क, प्रशासकीय कौशल्य आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सौम्य स्वभाव, संवादकुशलता आणि लोकांसाठी सतत उपलब्ध राहण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी होती. धाराशिव, लातूर परिसराशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करून शोकसंवेदना व्यक्त केल्या.


 
Top