धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील बालाजी नगर येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात आयोजित दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त गुरुचरित्र ग्रंथ पारायण, भजन प्रवचन कीर्तन महाप्रसाद आधी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

धाराशिव शहरातील बालाजी नगर येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त दि.28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबर दरम्यान गुरुचरित्र ग्रंथ पारायण कार्यक्रम पार पडला. दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी सुनील विटकर, विनायक जाधव यांच्या हस्ते यज्ञ पूजा करण्यात आली. याचे पुरोहित राजकुमार स्वामी यांनी केले. स्वामी समर्थ महाराजांची पालखी नगर प्रदक्षिणा आकाश महाराज वारकरी शिक्षण संस्था वाघोली यांच्या बालवारकऱ्यांसोबत काढण्यात आली. हभप पूजाताई कुंभार महाराज बारामती यांचे कीर्तन झाले. त्यानंतर विनायक जाधव यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ यांची भजन सेवा झाली. या दरम्यान दिनेश बंडगर यांच्या हस्ते सायंकाळी आरती करण्यात आली.  तर प्रजापती विष्णू प्रभू यांचे प्रवचन झाले. या कार्यक्रमासाठी यशवंत सोनटक्के, संतोष क्षीरसागर, बालाजी भिसे, ओंकार वायकर, राजभाऊ ढवळे, प्राचीताई कोळगे, प्रणिता राठोड, माधुरी गायकवाड, तेजसकुमार नागवसे, नंदकुमार नागवसे, भाऊ घेवारे, नागेश घेवारे, पाटील, कृष्णा पुराणिक, शेरखाने, नागेश कांबळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 
Top