मुरूम (प्रतिनिधी)- जि प स्पेशल प्राथमिक शाळा मुरुम येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त बालसभाचे आयोजन करण्यात आले.  इयत्ता सहावी विद्यार्थी बालसभेत सहभागी होऊन अध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड होते. विचारांची देवाणघेवाण करुन आपली मते प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे होते. प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार लिमये, रुपचंद ख्याडे, शिवाजी गायकवाड, अंगद थिटे, आशालता शिवकर आदि उपस्थित होते.  याप्रसंगी निर्मलकुमार लिमये, रुपचंद ख्याडे, प्रमिला तुपेरे मनोगत व्यक्त केले. शिवाजी गायकवाड यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षदा कांबळे सूत्रसंचालन कनिष्का किरात व आभार चैतन्य भालेराव यांनी मानले.

 
Top