मुरुम (प्रतिनिधी)-  येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा  केसरजवळगा या शाळेत कालकथीत आदप्पा गायकवाड हे मातीला सोनं करणारे, स्वप्नांना दिशा देणारे, स्वतःपेक्षा मोठं जगणारे आणि समाज घडवणारे व्यक्तिमत्त्व होते. अशी माणसं कधीच जात नाहीत; ती फक्त रूप बदलून इतिहासाच्या पानांवर अमर होऊन राहतात, असे भावपूर्ण उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले.

त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून शिक्षणाविषयीची त्यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रतीची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. या कार्यक्रमास संजीवकुमार गायकवाड, डॉ. श्रेयस गायकवाड, श्रुती गायकवाड, विजयकुमार गायकवाड यांच्यासह गुंडाजी कांबळे, दत्तू गायकवाड (माजी सरपंच), अमोल पटवारी, जयंपालसिंग राजपूत (उपसरपंच), संदीप पाटील (अध्यक्ष शा. व्य.), अजीज शेख (उपाध्यक्ष), केंद्रप्रमुख संतोष बोडरे, शिरीष पाटील, पंडित जळकोटे, दिव्यांग संघटना अध्यक्ष विशाल गायकवाड, विजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र मु अ बालाजी भोसले, सहशिक्षक संजीव भोसले, सुनिल राठोड, सुंकेवार सर, कुन्हाळे सर , अनंत वाघमोडे, साधना ताशी आदींनी परिश्रम घेतला. या कार्यक्रमाच्या  माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आदप्पा गायकवाड यांच्या समाजोपयोगी कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करून अशाच उपक्रमांतून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.   सुत्रसंचलन मु अ बालाजी भोसले यांनी तर आभार सुनिल राठोड यांनी मानले.

 
Top