परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव नगरपरिषद नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. नेहाताई राहुल काकडे या विक्रमी मताधिक्याने आणि त्यांचे पती व निर्वाचित नगरसेवक भाजपा युवा मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. राहुल काकडे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांसह परंडा येथे भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली.
नगराध्यक्ष सौ. नेहाताई काकडे व नवनिर्वाचित नगरसेवकांचा परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, नगरसेवक श्री. रमेशसिंह परदेशी, युवा नेते नगरसेवक समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अजित काकडे, बाबासाहेब जाधव, किरण देशमुख, साहेबराव पाडुळे, तानाजी घोडके, रामदास गुडे, डॉ. आनंद मोरे, धनंजय काळे, रामकृष्ण घोडके, गजानन तिवारी, पांडुरंग मुसळे, अमर ठाकूर, गौरव पाटील, संतोष गायकवाड, सिध्दीक हन्नूरे, सुरज काळे, व्यंकटेश दिक्षित, तुषार कोळेकर, जयंत भातलवंडे, समाधान कोळेकर, तसेच इतर मान्यवर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
