धाराशिव (प्रतिनिधी)- स्थानिक बातमीदारांवर दबाव आणि ड्रग्ज माफिया मोकाट अशी स्थिती तुळजापूरात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ड्रग्ज प्रकरण इतकं हलक्यात घेत आहेत. असा थेट सवाल आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा सभागृहात उपस्थित केला.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, तुळजापूर शहरात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 'अग्रवाल' नावाचा मुख्य आरोपी असूनही, पोलीस त्याला अद्याप अटक का करत नाहीत? असा थेट सवाल आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळात विचारला आहे. इतकेच नाही तर, या संवेदनशील विषयावर बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आणि माध्यमांवर दबाव टाकला जात असल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला आहे. ज्याच्यामुळं तुळजापूर बदनाम होत आहे. त्यांना अभय व त्याविरोधात जे आवाज उठवतात त्यांच्यावर दबाव आणणे यामुळे सरकारच्या भूमिकेवर पाटील यांनी संशय व्यक्त केला. ड्रग्ज माफियांना कोणाचे पाठबळ आहे आणि सत्य मांडणाऱ्या पत्रकारांचा आवाज का दाबला जातोय? यावर सरकारने तातडीने उत्तर द्यावे, अशी मागणी कैलास पाटील यांनी लावून धरली आहे.
