धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय राज्य घटनेने शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धाराशिव येथे बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
धाराशिव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धंनजय शिंगाडे, माजी नगराध्यक्ष खलीफा कुरेशी, मसुद शेख , इरफान कुरेशी, बाबा मुजावर, जीवन देशमुख, जालिंदर पांचाळ, खलील पठाण, विशाल शिंगाडे, असद पठाण, समय्योदुन मशयाक, पठाण सोहेब , शरनम शिंगाडे, पद्नात ओव्हाळ, सुगत सोनवणे, अविनाश शिंगाडे, नुरखा पठाण, मिलीद पेठे, जितेंद्र बनसोडे, इफ्तेकार मुजावर, शारिफुत शिंगाडे, ताहेर शेख, उद्धव कांबळे, सतिश बनसोडे, कलीम कुरेशी, रोहन शिंगाडे, धमपाल बनसू, चंद्रमणी बनसोडे, रावसाहेब शिंगाडे, आबा सुर्यवंशी, अँड परवेज काझी यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
